'कर्ज' ही संकल्पना आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. वैयक्तिक वा व्यावसायिक कर्जाची गरज आपल्याला भासत असते, लेखक प्रदीप मांडके यांनी 'कर्जे देताना-घेताना' या पुस्तकात कर्ज ही संकल्पना विस्ताराने स्पष्ट केली आहे.
* घर खरेदी, वाहन खरेदी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी व्यक्तीला पैशांची गरज असते, अशा वेळी त्याला सुलभपणे कर्ज मिळाले तर त्याचे काम मार्गी लागते. अशा वैयक्तिक कर्जासाठी कोणत्या गोष्टींची आणि कागदपत्रांची पूर्तता करायची याची माहिती दिली आहे.
* बँकेच्या संचालकांपासून, कर्ज विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना कर्ज-प्रकरण तयार करण्यापासून ते कर्ज-खात्याची वसुली करण्यापर्यंत सर्व प्रकारच्या नियमांची तसेच प्रक्रियांची पूर्तता करावी लागते. याविषयी मार्गदर्शन केले आहे.
* उत्पादन, व्यापार आणि सेवाक्षेत्र या तीनही क्षेत्रांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दीर्घ मुदतीचे तर व्यवसाय चालविण्यासाठी खेळत्या भांडवलाची नितांत गरज असते. व्यावसायिक कर्जाविषयीचे मार्गदर्शन यामध्ये केले आहे.
* 'रिझर्व बँक ऑफ इंडिया'चे यासंबंधीचे आदेश आणि त्याची अंमलबजावणी याचीही माहिती पुस्तकामध्ये असल्याने 'कर्ज' हे ओझं न वाटता त्याआधारे प्रगती करण्यास साहाय्य यातून मिळू शकेल!
* हे पुस्तक बँकिंग क्षेत्रातील अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल!
Sakal Prakashan's Karje Detana-Ghetana (Marathi-कर्जे देताना-घेताना: कर्ज-मंजुरी ते कर्जफेड प्रक्रियांचा तपशील) by Pradeep Mandke
- Publisher: Sakal Prakashan
- Book Code: 9789395139021
- Availability: 10
-
Rs299.00
Related Books
Tags: Sakal Prakashan, Karje Detana Ghetana, Marathi Book, कर्जे देताना-घेताना: कर्ज-मंजुरी ते कर्जफेड प्रक्रियांचा तपशील, Pradeep Mandke