Quantcast
  • Rajhans Prakashan's Sathe Uttaranchi Kahani [साठे' उत्तराची कहाणी: नामवंत अर्थ तज्ञाचं वेधक आत्मकथन] by Sumedh Vadawala (Risbud)

आयुष्यात बरेच चढउतार आले. त्यामुळे आयुष्य अनुभवसंपन्न झालं, शिवाय कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देण्याचं कौशल्य अंगी बाणलं. बँकिंग क्षेत्रात, मग विमाक्षेत्रात आणि नंतर खासगी म्युच्युअल फंड कंपनीत काम केल्याने आर्थिक क्षेत्राचा सर्वंकष अनुभव मिळाला. दिलेलं काम निष्ठापूर्वक आणि न कुरकुरता करणं, आपल्या कामाचा ठसा उमटवणं, तेच काम वेगळ्या तऱ्हेने अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल का याचाशोध घेणं आणि निर्णय घेण्यात दिरंगाई न दाखवता विवेकबुद्धीला स्मरून धडाडीचे निर्णय घेणं यांत माझा हातखंडा होता. ऑफिसचं काम करताना कठोर कारवाई करणे गरजेचं दिसलं, तिथे ती करताना हयगय केली नाही आणि कुणाचा मुलाहिजाही ठेवला नाही.

कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीने शरीर पोखरलं. एकदा, दोनदा, नव्हे तीन वेळा. तरीही पुन्हा नव्या उमेदीने आणि उत्साहाने नव्या प्रकारच्या कामात झोकून दिलं. कॅन्सरची भीती जनमानसात खोलवर रुजली आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना मानसिक आधाराची खूप गरज असते. मला असे कोणी रुग्ण कळले की मी आवर्जून त्यांना भेटतो. माझं त्या व्याधीतून बाहेर पडणं त्यांना जगण्याची नवी उमेद देतं.

अर्थविश्वातील आपल्या प्रत्येक कार्यक्षेत्रावर ठसा उमटवणाऱ्या कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीशी यशस्वी झुंज देणाऱ्या नामवंत अर्थतज्ज्ञाचं वेधक आत्मकथन.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Rajhans Prakashan's Sathe Uttaranchi Kahani [साठे' उत्तराची कहाणी: नामवंत अर्थ तज्ञाचं वेधक आत्मकथन] by Sumedh Vadawala (Risbud)

  • Rs360.00