Quantcast
  • Adishrey's सरकारी कामे करा फटाफट | Sarkari Kame Kara Fatafat in Marathi by Manoj Awale

Adishrey's "सरकारी कामे करा फटाफट" सेवाहमी कायदा, विविध दाखले , परवाने, आरोग्य योजना, पासपोर्ट याची माहिती देणारे एकमेव पुस्तक.शासकीय योजनांचा लाभ , शाळा व महाविद्यालय प्रवेश, शिष्यवृत्ती, कर्ज, वारस नोंद , नोकरी आदी विविध कारणांसाठी नागरिकांना विविध प्रकारचे दाखले लागत असतात. परंतु, हे दाखले कसे मिळतात, यासाठीची कुठली कागदपत्रे लागतात, कुठल्या अधिकार्याकडे दाद मागावी, दाखल्यांसाठीचा कालावधी व शासकीय फी किती याची माहिती सामान्य नागरिकांना नसते. त्याचा गैरफायदा मध्यस्थ उठवतात.सरकारी कार्यालयांमध्ये तसेच सेतू, महा - ईसेवा केंद्रामध्ये मिळणारे दाखले, त्यासाठीची कागदपत्रे व लागणारा कालावधी याची माहिती देण्याचा प्रयत्न या पुस्तकद्वारे केला आहे. त्यामुळे नागरीकांचा मनस्ताप वाचेल व त्यांची कामेही झटपट होतील असा आशावाद आहे. सध्याच्या काळात आरोग्यसेवा महागडी झाली आहे. आरोग्याबाबत असलेल्या शासकीय योजनेची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. याबरोबरच पासपोर्ट, जमीन महसूल विषयक कामे , आदीची माहिती दिलेली आहे. सर्वसामान्य नागरिक , शेतकरी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते , पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त अहे. सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांच्या हितासाठी हे पुस्तक लिहिले आहे. 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Adishrey's सरकारी कामे करा फटाफट | Sarkari Kame Kara Fatafat in Marathi by Manoj Awale

  • Rs60.00


Tags: Sarkari Kame Kara Fatafat in Marathi by Manoj Awale